Vani : शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी केली अटक….

0
13

Vani : सध्या शेतकऱ्यांचे व दलाल व्यापाऱ्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात रुजले आहे. अशातच वणी पोलीस ठाणे हद्दीतील हस्तेदुमाला शिवारात एका द्राक्ष व्यापाऱ्याने फेब्रुवारी महिन्यात सहा शेतकऱ्यांचा द्राक्ष माल खरेदी करून त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोणतेही प्रकारचे रोख रक्कम अथवा चेक असे पैसे न देता ४९,१९,०५२. रुपये किमतीची शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली होती. याबाबत हस्ते हस्तेदुमाला येथील शेतकरी गणेश बबनराव महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वणी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६६/२०२३ कलम ४२० भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर या गुन्हयातील आरोपी मोहम्मद अन्वर शाह (वय वर्ष ४५, रा. सीतामढी, राज्य बिहार) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर आरोपी हा बिहार, गुजरात तसेच मुंबई शहरात आपले अस्तीत्व लपवून वास्तव्य करत होता. वणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपीचा मागोवा काढण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यानूसार पथकाने आरोपीचे सध्याचे वास्तव्याबाबत गोपनीय माहिती काढून तो कल्याण तालुक्यातील बनेली गाव परिसरात असल्याचे खात्रीशीररित्या समजले.

 

मिळालेल्या माहिती प्रमाणे पोलीस पथकाने कल्याण तालुका परिसरात स्थानिक पोलीसांचे मदतीने शाहला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कडून २ गावठी कट्टे मिळाले आहे तर त्या विरुध्द कल्याण तालुका पोलीस ठाण्यात ३९२/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या सदरच्या गुन्ह्यात आरोपी शाह हा कल्याण जिल्हा कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असल्याने मा. न्यायालयाकडून त्याचा ताबा घेऊन त्यास वणी पोलीस ठाण्यातील फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने २८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड मंजूर करण्यात आला व आरोपी यास कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग पुष्कराज सुर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पो.स्टे. चे सपोनि निलेश बोडखे, पोउनि प्रविण उदे, पोना. कुणाल मराठे, पोकॉ. राहुल आहेर तसेच पोना. हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर आरोपी ताब्यात घेऊन कामगिरी केली आहे.

 

शेतकऱ्याचे लाखो रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या भामट्या द्राक्ष व्यापाराला पकडण्याच्या वणी पोलीस पथकने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दखल घेऊन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास, १०, हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here