द पॉईंट नाऊ ब्युरो : तालिबानच्या जुलमी राजवटीला कंटाळलेल्या अफगाण नागरिकांना निसर्गाने देखील तीव्र झटका दिला आहे. इथे झालेल्या भूकंपात तब्बल 130 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अफगाणिस्तान मध्ये पूर्व भागात 6.1 रिष्टर स्केलचा भूकंपाचा तीव्र स्वरूपाचा धक्का बसला आहे. ज्यात 130 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अनेक जण या धक्क्यात जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अफगाणिस्तान मध्ये तालिबानने सत्ताधाऱ्यांची सत्ता उलथवून सत्ता आपल्या ताब्यात घेतली. तेव्हापासून इथल्या नागरिकांना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इथे जवळपास अर्ध्यावर लोकसंख्या भुकेने त्रस्त आहे. आधी जी भाकरी जनावरांना खाऊ घातली जात होती, ती भाकरी खाण्याची वेळ अफगाण नागरिकांवर आलेली आहे. रस्त्यावर या शिळ्या भाकरींचे दुकान लागलेले दिसून येतात. नागरिकांना या भाकरी विकत घेऊन आपले पोट भरावे लागत आहे.
त्यात आता 6.1 रिष्टर स्केलच्या भूकंपाने देखील नागरिकांना तीव्र धक्का दिला आहे. यात 130 जण मरण पावले आहेत. तालिबानची सत्ता आल्यापासून इथे कुठे ना कुठे रोज हल्ले होऊन लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आधीच इथले नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. आणि आता अशात भूकंपाने देखील इथे मोठा हादरा दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम