द पॉईंट नाऊ ब्युरो : पुण्यामध्ये एका लष्करी जवानाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोरख नाथाभाई शेलार या 24 वर्षीय लष्करी जवानाने व्हिडिओ बनवत आणि चिट्ठी लिहून आत्महत्या केली.
मला घटस्फोट दे आणि 15 लाख रुपये दे अशी संबंधित जवानाच्या पत्नीने मागणी केली होती. यासाठी गोरख यांना त्यांच्या पत्नीद्वारे वारंवार त्रास दिला जात होता. असा आरोप करण्यात आला आहे.
लष्करी जवान हा देशाच्या नागरिकांच्या संरक्षणार्थ झटत असतो, लढत असतो. मात्र या जवानाला त्याच्याच घरात, घरच्याच लोकांनी त्रास दिला असल्याचे समोर आले आहे. शत्रूंना आपल्या शौर्याने जेरीस आणणाऱ्या जवानाला त्याच्या घरच्याच लोकांनी मात्र हार मानण्यास भाग पाडले.
याबाबत पोलिसांनी जवानाची पत्नी आणि सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम