the point now: अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील माध्यमिक शाळेत आत्मघातकी तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या दुर्घटनेत 20 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला असून बरेच विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत ती शाळा हजारा समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या ठिकाणी आहे. तर इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर हजारा समुदाय असल्याचे म्हटले जात आहे.
अफगाणिस्तानची राजधानी आज तीन बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. पहिला स्फोट मुमताज एज्युकेशनल सेंटरजवळ झाला. त्यानंतर दुसरा स्फोट अब्दुल रहीम शहीद हायस्कूलच्या समोर झाला. हा स्फोट झाला त्यावेळी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत होते. त्यामुळे या घटनेत 20 हूनअधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मृतांची संख्या अजून स्पष्ट झालेली नाही. स्फोटात सापडलेल्या जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलशले असून.अजूनही या घटनेची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. याआधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातील काबुलमधील एका मोठ्या मशिदीवर बॉम्ब फेकण्यात आला होता. नमाज सुरु असतानाच हल्ला झाल्याने त्यावेळी 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर एका संशयिताला अटक करण्यात आली होती.मात्र, शिया हजारा समुदायाविरोधात होणारे हे हल्ले इस्लामिक स्टेटकडून केले जात असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम