द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतात अनेक परदेशी पाहुणे पर्यटनाच्या दृष्टीने येत असतात. भारताची प्रतिमा संपूर्ण जगात एक सुसंस्कृत देश म्हणून आहे. मात्र काही महाभागांमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो. असाच धक्कादायक प्रकार राजस्थान येथे घडला आहे. येथे एका विदेशी महिलेवर मसाज करण्याच्या बहाण्याने एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भारतात जवळपास प्रत्येक राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक ठिकाणे आहेत. राजस्थान मध्ये देखील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. येथील जयपूर मध्ये मात्र एका परदेशी महिलेवर एका हॉटेलमध्ये मसाज करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेदरलँड येथील एक महिला येथे पर्यटनासाठी आलेली होती. मात्र एका नराधमाने आयुर्वेदीक बॉडी मसाजच्या नावाखाली या 31 वर्षीय परदेशी महिलेवर बलात्कार केला. बुधवारी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. देशाच्या प्रतिमेला अशा महाभागांमुळे मोठ्या प्रमाणावर क्षती पोहोचत आहे. अशा घटनांमुळे परदेशी पर्यटकांच्या मनात देशाची प्रतिमा मलिन होण्याची भीती आहे. यामुळे अशा घटनांना आळा बसने आवश्यक आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम