आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली पैश्यांची बॅग; पोलिस तपास सुरू

0
35

मुंबई – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंग्यातील घराबाहेर पैशांनी भरलेली बॅग सापडली आहे. पैशांसोबत या बॅगमध्ये सोने व चांदीच्या मूर्तीदेखील आहेत. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

प्रसाद लाड यांच्या माटुंग्यातील निवासस्थानाबाहेर अज्ञात व्यक्तीने ठेवलली बॅग तिथल्या सुरक्षारक्षकाला आढळली. ही बॅग सापडल्यानंतर त्याने प्रसाद लाड यांना यासंदर्भात माहिती दिली. ही बॅग नक्की कोणाची आणि कोणी ठेवली याचा शोध घेतला जात असून हा चोरीचा मुद्देमाला असावा असा प्राथमिक संशय आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता बॅगेत पैसे तसेच सोने, चांदीची मूर्ती सापडल्या आहेत. प्रसाद लाड यांच्या घराला कडेकोट बंदोबस्त असतानाही अशाप्रकारे बॅग सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस सध्या तपास करत असून परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here