काय सांगता….. सभेआधी राज ठाकरेंचे हातपाय थंड पडता…? ; वाचा सविस्तर काय आहे प्रकरण

0
36

मुंबई प्रतिनिधी : राज ठाकरेंच भाषण हा नेहमी श्रोत्यांचा आवडीचा विषय आहे. त्यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो त्यामुळे गर्दीचे लोट सभेला उपस्थित असतात. राज ठाकरे भाषणाची तयारी कशी करत असतील हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. मात्र ”सभेच्या आधी माझे हात-पाय थंड पडतात आणि मी नेमकं काय बोलणार आहे, हे मलाच माहीत नसतं” असं म्हणत राज ठाकरेंनी गुगली टाकलीय.एका खाजगी वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

राज ठाकरेंची सभा असते तेव्हा आम्ही कोणीही त्यांच्या खोलीत जात नाही असे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.राज ठाकरे खूप वाचन करतात असे देखील त्यांनी सांगितले.सभेतील भाषणासाठी आपण अनेक मुद्दे तयार करतो ,तसेच अनेक विषय डोक्यात असतात पण ऐनवेळेस आपल्याला काय बोलायचे आहे हे मलाच माहीत नसतं असे राज ठाकरेंनी सांगितले.

तसेच आपल्यासमोर कोण आहे याकडेही माझे लक्ष नसते असे ते म्हणतात.शर्मिला ठाकरेंनी त्यांच्या या वक्तव्यावर , मी समोर असून ते माझ्यासमोरून गेले,मात्र त्यांनी मला पाहिले नाही. मात्र नंतर मी कुठे आहे असे विचारलं. राज ठाकरेंनी सभा, भाषणे , आंदोलनातील अनेक किस्से सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here