जोतिबाचा डोंगर धुण्यास वरून राजाची हजेरी ; डोंगरावरील गुलाल पायथ्याशी

0
56

कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबाच्या डोंगरावरील गुलाल अवेळी आलेल्या मुसळधार पावसाने वाहून गेला. वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने भाविक, ग्रामस्थ आणि दुकानदारांची पूर्ती तारांबळ उडाली.
सोसाट्याच्या वारा,धुळीचे लोट तसेच विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर जिल्ह्यात गारांचा वर्षाव झाला.उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पर पडलेल्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेमध्ये पाच ते सहा लाख भाविक दख्खनच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते . त्या मुळे जोतिबाचा डोंगर या यात्रेमुळे गुलालाने सजला होता. मंदिराचे शिखर आणि आवार देखील गुलालाने माखले होते. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पूर्ण डोंगर धुवून निघाला आहे आणि याची व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे.

वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे पडली.तसेच डोंगरावरून येणारे पाणी गुलालाने गुलाबी रंगाचे झाले होते. ४० चा पारा तापमानाने पार केला असतानाच गुरुवारी ५ च्या सुमारास काळ्या ढगांनी आकाशात हजेरी लावली.धुळीच्या वादळाने कोल्हापूर जिल्हा वर धुळीची चादर पसरली होती. उन्हाने त्रासलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here