धक्कादायक ; गाव गुंडांनी घेतला दहावीच्या विद्यार्थ्यांचा बळी चांदवड मधील प्रकरणाने खळबळ

0
6

नितीन फंगाळ
चांदवड : २८ एप्रिल रोजी तळेगाव रोही येथील आपल्याच घरात शुभम राजाराम वाकचौरे याने आत्महत्या केल्याची खबर चांदवड पोलीस स्टेशनला राजाराम वाकचौरे या पालकातर्फे देण्यात आली या घटनेचे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.

घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी करून या विद्यार्थ्यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. परंतु नातलगांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. शुभम याने आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोप करण्यात आला.या संदर्भात शुभमने संशयितांचा नावाने चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची चर्चा नातेवाईक व गावांमध्ये चर्चिली जात होती त्या पद्धतीने तपास करून चांदवड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केला असता त्यात कुठेतरी आढळून आले आली त्यामुळे त्या दिशेने तपास केला व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय खरा ठरला सदर घटना ही प्रेमप्रकरणातून घडली असल्याची चर्चा असून गावातील दहा जणांविरुद्ध चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात विजय भोकनळ याने त्याच्या मित्रांचे मदतीने शुभम त्याचे आई-वडील यांना मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. यात विजय भोकनळ, योगेश वाकचौरे, गणेश सोनवणे, विठ्ठल भोकनळ, अक्षय भोकनळ, युवराज भोकनळ, बाळासाहेब भोकनळ, अमोल भोकनळ, आकाश भोकनळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चांदवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here