एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलनास दिमाखात सुरवात

0
7

नितीन फंगाळ
चांदवड : येथील नॅक मानांकित ‘अ ‘ दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व.सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी सप्तरंग २ के २०२२ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन व सप्तरंग २ के २२ फलकाचे अनावरण संस्थेच्या विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे, तांत्रिक सल्लागार डॉ. आर. जी. ताथेड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. दिनेशकुमारजी लोढा यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ट्रॅडिशनल डे व ग्रुप डे यासारख्या विविध कार्यक्रमाने करण्यात आली.
सदर स्नेह संमेलनाची सांगता दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी कला व सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे.

या स्नेहसंमेलनाचे आयोजन स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. ठाकरे एस. एस. यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे व उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.

सदर कार्याक्रमचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितेचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी व श्री. सुनीलकुमारजी चोपडा आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here