पेट्रोल-डिझेल बरोबरच आता वाहतुकीच्या पीयूसी दरात देखील वाढ झाली. सर्वसामान्यांना आता वाहन चालवणे महागात पडणार आहे. महाराष्ट्रातील पीयूसी दरात वाढ झाली आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांची चाचणी केली जाते. हे प्रदूषण नियंत्रणात आहे की नाही हे पाहण्यासाठी वाहनांची प्रदूषणासंदर्भातील एक चाचणी केली जाते.
अनेक वाहनधारक आपल्या दुचाकी आणि चारचाकीच्या पीयूसी चाचणीकडे लक्ष देत नाहीत. मात्र असं करणं चांगलंच महागात पडणार आहे. महाराष्ट्रातील पीयूसीचे दर आता वाढले आहेत. याबाबत एक परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. पीयुसी चाचणी केली नसल्यास 35 रुपयाची पीयूसी चाचणी आपणांस 2 हजार रुपयांना पडेल. वाहन नवीन असेल तर 2 वर्षांनंतर व त्याहून जास्त कालावधी असलेल्या वाहनांची दर 6 महिन्यांनी पीयूसी चाचणी होणे आवश्यक असते.
अधिकार आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी वाहने जप्त केल्यानंतर किंवा कारवाईच्या वेळी पीयूसी कागदपत्राची मागणी केली जाते. त्यावेळी जर कागदपत्रे नसेल तर किंवा चाचणी केलीच नसेल तर संबंधित वाहनांवर 2 हजार रुपयांचा दंड केला जातो. 2020-21 मध्ये या कार्यालयाकडून 109-38 कोटी इतकी महसूल वसूली करण्यात आलेली होती.
पीयूसीचे नवे दर –
दुचाकी वाहनासाठी 35 रुपये 50 रुपये
पेट्रोलवरील तीनचाकी वाहने 70 रुपये 100 रुपये
पेट्रोल, एलपीजी, सीएनजीवरील चार चाकी वाहने 90 रुपये 125 रुपये
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम