मागील महिन्यात विक्रम आणि रशियाच्या युद्धामुळे इंधन दरावर मोठा परिणाम झाला होता. पेट्रोल डिझेलच्या दरात दररोज बदल होत असतात तर आता नागरिकांना दिलासा देणारी बाब म्हणजे कोणतीही दरवाढ झालेली नाही. . आज रोजी पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले आहेत.
देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय चेन्नईत आज एक लिटर पेट्रोलचा दर 110.85 रुपये आणि डिझेलचा दर 100.94 रुपये आहे. देशात सतत होणाऱ्या महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तर पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजी गॅस मध्ये देखील दरवाढ झाली दरवाढीमुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम