देवळा : येत्या ३ मे रोजी रमजान ईद ,अक्षय्य तृतीया हे सण उत्सव उत्साहात साजरे करण्यात यावेत ,जातीय सलोखा कायम राखावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी आज देवळा येथे केले .
देवळा पोलीस ठाण्यात गुरुवारी दि २८ रोजी शांतता समितीची बैठक पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . यावेळी त्यांनी सांगितले . ते पुढे म्हणाले की , सद्या गेल्या काही दिवसांपासून जातीय घटनांच्या अनुषंगाने देश व राज्य पातळीवर हिंदू मुस्लिम समाजात विविध मुद्द्यावरून धार्मिक दरी निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिमा सुरू असल्याने एखाद्या तणावाच्या मुद्द्यावरून राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने समाजकंटकांकडून सामाजिक वातावरण खराब करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही . यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी . व येणारे सण उत्सव एकोप्याने साजरे करावेत ,असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले .
यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर,माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, नगरसेवक भूषण गांगुर्डे , यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल आहेर, सदस्य योगेश वाघमारे, बाबाजी निकम, समाधान आहेर ,नईम शेख,युनिस पठाण,रिझवान तांबोळी, प्रतीक आहेर,दिलीप आहेर, संदीप पाटील ,आरपीआयचे कैलास पवार , मनसेचे संदीप देवरे , उमेश आहेर , पिंटू देवरे , यशवंत देवरे ,पोलीस नाईक सचिन भामरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . प्रस्तावित पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम