कोरोना काळापासून राज्याची आर्थिक स्थिती ढासळली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. अशातच दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेल, खाद्य तेल, तर गाडीभाडे यातील वाढ, अन्नधान्यासाठी होणारी वाढ अशा अनेक दरातील वाढीमुळे नागरिक संकटात अडकले आहेत. सी एन जी गॅस मधील दरवाढ वाढत असून रिक्षाचालकांनी देखील आता संप पुकारला आहेत.
बांद्रा कुर्ला संकुल येथील कार्यालयावर ऑटोरिक्षावाहनांसह मंगळवारी 17 मे रोजी सकाळी 11 वाजता मोठा मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. ऑटो रिक्षा चालक आंदोलन करणार आहेत. ऑटोरिक्षा चालक मालक यांना सीएनजी इंधन कमी दराने मिळावे या मागणी करिता महानगर गॅस लिमिटेड येथे मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. खाजगी वाहनांनी सुद्धा सी.एन.जी. इंधनावर चालावी यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे सीएनजी इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्येतही वाढ झाली आहे.
ऑटोरिक्षा हे सार्वजनिक प्रवाश्यांकरता वाहतूकीचे साधन आहे, तसेच या वाहनातून लाखो प्रवासी रोज एम. एम. आर. क्षेत्रांमध्ये प्रवास करतात. एसटी कर्मचाऱ्यांनी पगारात वाढ करण्याकरता व त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता आंदोलन केले होते. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आपण पाहिलं. त्यानंतर आता रिक्षा मालक चालक देखील संप करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम