![IMG-20220426-WA0039](https://thepointnow.in/wp-content/uploads/2022/04/IMG-20220426-WA0039.jpg)
देवळा : तालुक्यातील लोहोणेर येथील वैभव अलई यांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला . भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने भारतीय राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
![](https://thepointnow.in/wp-content/uploads/2022/04/IMG-20220426-WA0039-300x167.jpg)
या निबंध स्पर्धेत तालुक्यातील लोहोणेर येथील वैभव अलई यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल (25) एप्रिल रोजी मुंबई येथील भाजपा मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 75000 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे परितोषिकाचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा उपाध्यक्ष माधव भंडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी पदाधिकारी उपस्थित होते. अलई यांच्या यशाबद्दल आमदार डॉ राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर , तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण ,वैभव धामणे आदींनी अभिनंदन केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम