चांदवड : माणसाची मैत्री असावी.व्यक्तिमत्व विकास आणि सर्जनशीलता ही पुस्तकांच्या पानापानांवर मधून घडत जाते. पुस्तके ही सुंदर मित्र आहेत.” असे प्रतिपादन चांदवड ग्रंथालयाचे ग्रंथपाल संतोष ठाकरे यांनी केले.मराठी विभाग इंग्रजी विभाग आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ज्या ती ग्रंथ दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ तुषार चांदवडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागाचे प्रा किशोर अहिरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जागतिक पुस्तक दिन विविध पद्धतीने कसा साजरा होतो हे सांगितले. जागतिक पुस्तक दिन हा शेक्सपियर आणि विचारवंत यांचा स्मरण करण्याचा दिवस आहे असे अहिरे म्हणाले. प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना ग्रंथपाल संतोष ठाकरे यांनी शेक्सपियरच्या साहित्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. शेक्सपियर यांनी अवघ्या पन्नाशीत 38 नाटके आणि 154 कविता लिहिल्या. जगविख्यात साहित्यिक म्हणून आपले स्थान निर्माण केले.अध्यक्ष मनोगत प्रोफेसर डॉ तुषार चांदवडकर यांनी व्यक्त केले.
जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिलला साजरा करण्यामागची भूमिका त्यांनी मांडली. युनेस्को आणि त्या संबंधित संस्था जगभर जागतिक पुस्तक दिन साजरा करतात.लोकांमध्ये वाचनाची सवय वाढविणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हा या मागील हेतू आहे. विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हांटिस,आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील नामवंत व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला.त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले.वाढदिवस पहिल्यांदा 23 एप्रिल 1923 रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. त्यामुळे जागतिक पुस्तक दिनाला एक वेगळे महत्त्व आहे ” असे डॉ.चांदवडकर म्हणाले.
या वेळी प्रोफेसर चांदवडकर यांनी विद्यार्थ्यांसाठी पुस्तकवाचन अभियान स्पर्धा जाहीर केली.25 एप्रिल ते 10 मे या काळात विद्यालयातील ग्रंथालयात मधून सर्वात अधिक प्रमाणात पुस्तके वाचणारे विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहे.स्वर्गीय येकी चांदवडकर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ही पारितोषिके देण्यात येतील.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन इंग्रजी विभागाचे प्रा. सोमनाथ मुर्तडक यांनी केले. यावेळी प्रा.संदीप पगार, प्रा श्रीमती .व्ही. आर. जाधव, डॉ.चांगदेव कुदनर, प्रा.मच्छिंद्र बनकर, प्रा. मुकेश देशमाने, प्रा. संजय कोळी, सागर( माऊली) साठे उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम