पुन्हा ‘ हुंडा ‘ बळी ; नवविवाहितिची आत्महत्या तर माहेरच्यांनी पेटवला संसार

0
28

चांदवड : हुंडा हा समाजाला लागलेली किडच म्हणावी लागेल अद्यापही ती थांबलेली नाही. चांदवड येथे भयानक घटना घडली असून गाडी घेण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणावे यासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या जाचास कंटाळून नवविवाहितेने विहिरीत उडी घेऊन (married woman Suicide ) आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील (nashik) काजीसांगवी येथे घडली.

या घटनेनंतर संतापलेल्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांचे घर पेटवून दिले. ही घटना वाऱ्यासारखी राज्यभर पसरली आहे, या प्रकरणी मयत महीलेचे वडील रामदास सरोदे (नांदूरखुर्द) यांनी पती, सासरे, सासू, नंदा अशा एकूण सात जणांविरोधात फिर्याद दिल्याने त्यांच्याविरोधात हुंडाबळीच्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

चांदवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील नांदूरखुर्द येथील रामदास एकनाथ सरोदे यांची मुलगी अश्विनीचा विवाह १५ फेब्रुवारी २०१९ रोजी काजीसांगवी येथील सचिन दिलीप ठाकरे यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून अश्विनीला पती सचिन ठाकरे, सासरे दिलीप ठाकरे, सासु जयाबाई ठाकरे, नंदा पुनम गुंजाळ, ज्योती पगार, वर्षा शिरसाठ आदी शारीरिक, मानसिक त्रास देत होते. असा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.

या त्रासाबाबत अश्विनीने माहेरच्या मंडळीना फोनवरुन कळवले देखील होते. त्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी येऊन समजूत घातली होती. कार घेण्यासाठी 5 लाख रुपये माहेरून आणावे यासाठी पती, सासू, सासरे, नंदा अश्विनीला सतत त्रास देत होते. यासाठी 1 लाख व 30 हजार रुपये अश्विनीचे सासरे यांच्याकडे अश्विनीचे वडील रामदास सरोदे यांनी दिले होते. मात्र उर्वरित पैसे न दिल्याने सासरची मंडळी अश्विनीचा शारीरिक, मानसिक त्रास करीत होते.

सासरच्या या त्रासाला कंटाळून अश्विनीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. या फिर्यादीवरून पती सचिन ठाकरे, सासरे दिलीप ठाकरे, सासु जयाबाई ठाकरे, पुनम गुंजाळ (नाशिक), ज्योती पगार (रा. मुसळगाव ता. सिन्नर), वर्षा शिरसाठ (रा. दिघवद), बाबुराव रेवजी शिंदे (रा. नैताळे, निफाड) यांच्याविरोधात हुंडाबळीच्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना चांदवड न्यायलयात नेले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले.

दरम्यान, मयत अश्विनी हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरे दिलीप ठकाजी ठाकरे यांचे घर पेटवून दिले. या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, कागदपत्रे, धान्य, पैसे, सोने, मोटरसायकल आदी जळून खाक झाले. या घटनेबाबत भूषण गंगाधर ठाकरे (३८, काजीसांगवी) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिल्याने मयत विवाहितेच्या माहेरचे परसराम निवृत्ती पवार (रा. नैताळे, ता. निफाड), दीपक निवृत्ती भालसिंगे, लहानू शिवराम झाल्टे, संदीप निवृत्ती भालसिंगे (मनमाड), चेतन लहानू झाल्टे (वागदर्डी) एक अज्ञात अशा ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयात नेले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here