देवळा : येथील डॉ दौलतराव आहेर पतसंस्थेचे सभासद बाळू महादू खैरणार (रा वासोळ ता देवळा ) यांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने संस्थेने खैरणार कुटुंबाला केअर हेल्थ इन्शुरन्सच्या मार्फत १० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली .

सोमवारी ( २५ ) रोजी संस्थापक केदा आहेर यांच्या हस्ते कै . बाळू खैरनार यांच्या वारस पत्नी रंजना खैरनार ,मुलगा सुनील खैरणार यांना इन्शुरन्सचा धनादेश देण्यात आला . यावेळी ,अध्यक्ष संजय आहेर ,व्यवस्थापक योगेश पाटील उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम