देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,५२७ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात १५,०७९ अॅक्टिव्ह रुग्ण असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, चीन आणि युरोपियन देशांमध्ये काही प्रमाणात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रूग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.
याआधी गुरुवारी दिवसभरात २ हजार ४५१ कोरोनाबाधितांची भर पडली होती. दरम्यान १ हजार ५८९ रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.५५ टक्के नोंदवण्यात आला होता. लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. ते पुन्हा कोरोना संक्रमित होणार नाही असा विचार करू नका. भलेही कोरोना लसीचे सर्व डोस घेतले असले तरी त्यांना कोरोना होऊ शकतो, हे समोर आले आहे.
कोरोना विरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८७ कोटी ४६ लाख ७२ हजार ५३६ डोस देण्यात आले आहेत. तर २ कोटी ६१ लाख ७७ हजार २४८ बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९२ कोटी ४० लाख ४५ हजार ६०५ डोस पैकी २० कोटी १० लाख ८२ हजार ८८५ डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम