द पॉईंट नाऊ ब्युरो : कृषिमंत्री दादाजी भुसे हे भाषण देत असतानाच मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मधील कृषी महाविद्यालयात हा प्रकार घडला.
कृषिमंत्री दादाजी भुसे हे हिंगोली दौऱ्यावर गेले आहेत. यात त्यांचा औंढा नागनाथ तालुक्यात कृषी महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला. दादाजी भुसे भाषण देत असतांनाच डाव्या बाजूचा मंडप जोरदार हवेमुळे कोसळला. यामुळे उपस्थित नागरिकांची धावपळ उडाली. मात्र दादाजी भुसे यांनी आवाहन केल्यावर नागरिक स्थिर झाले. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
दादाजी भुसे हे गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभात महिला, शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी मंडप कोसळल्याने सर्व घाबरले. मात्र भुसे यांनी आवाहन केल्यानंतर सर्व शांत झाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम