अंगणवाडी सेविका जयश्री गुजरे नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित

0
34

देवळा ; येथील अंगणवाडी सेविका जयश्री संतोष गुजरे यांना राज्य स्तरीय नारी शक्ती पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले , मनुष्यबळ विकास अकादमी तर्फे नाशिक येथे नुकतेच राज्य स्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन संपन्न झाले .

देवळा येथील अंगणवाडी सेविका जयश्री गुजरे यांना सन्मानित करतांना डॉ जयलक्ष्मी सानीपिना राव , रमेश आव्हाड आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

या महासंमेलनात देवळा येथील अंगणवाडी सेविका जयश्री गुजरे यांना इंटर नॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ . जयलक्ष्मी सानिपीना राव, जेष्ठ साहित्यीक रमेश आव्हाड व संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . याबद्दल अंगणवाडी सेविका गुजरे यांचे येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक , मुख्य सेविका कल्याणी चव्हाण , सहारे ,आहेर आदींसह अंगणवाडी सेविका ,मदतनीस आदींनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here