राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इस्लामपूर येथे आयोजित संवाद यात्रेच्या सभेत आमदार अमोल मिटकरी हजर होते. यावेळी केलेल्या वक्तव्याचा नाशिकमधील पुरोहित संघ व साधू महंतांनी जाहीर निषेध नोंदवत मिटकरी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दि. १९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी इस्लामपूर येथे संवाद यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, महंत अनिलशास्त्री देशपांडे, मुकुंद खोचे, माणिक शिंगणे, देशपांडे गुरुजी, अनिल शुक्ल, राजाभाऊ गायधनी, महाजन गुरुजी, श्याम नाचन, कुलकर्णी गुरुजी, विनोद थोरात, जगन पाटील आदींसह भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मिटकरी यांनी काही स्तोत्र म्हणून दाखवत जनसमुदाचे हास्य उडविण्याचा प्रकार समोर आला. देशभरात निषेध केला जात असून, नाशिकमध्येही त्याचे पडसाद उमटले.
पुरोहित संघ व साधू महंतांनी सांगितले की मिटकरी यांनी बेताल व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. यावेळी राज्याचे दोन मंत्री व्यासपीठावर होते त्यांनी मिटकरी यांना थांबवले नाही. मिटकरी यांनी तातडीने जाहीर माफी मागावी व राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम