मलिकांच्या अडचणीत वाढ, दोन्ही मुलांना ईडीचा समन्स

0
39

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कारण त्याच्यानंतर आता त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांना समन्स बजावण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. मलीकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यावर 22 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ईडीच्या वतीने मलिक यांच्या यांच्या दोन्ही मुलांना ईडीने अनेकदा समन्स बजावून देखील दोन्ही मुले चौकशीसाठी हजर झाली नाहीत.

यापूर्वी मलिक यांचा मुलगा फराज मलिक याला ईडीकडून तब्बल ३ वेळा तर अमीर मलिक याला 2 वेळा ईडीकडून नोटीस पाठवून आलेला आहे. मात्र, तरीही ते ईडीच्या चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याच प्रकरणात मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची काही मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here