महगाईची झळ, ब्युटी पार्लर आणि सलून दरात ३० टक्के वाढ

0
33

वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य नागरिकांना आणखी एक फटका बसणार आहे. मुंबईसह देशभरात दाढी आणि केस कापणं झाले महाग. मुंबईत आज सलून, ब्युटीपार्लर कामगार युनियनची बैठक पार पडली. बैठकीत हा दाढी, केस कापण्याच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई दररोजच्या विविध प्रकारचा वाढत्या महागाईमुळे सलून व ब्युटीपार्लच्या दरात देखील वाढ केली गेली. १ मेपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. याबाबत सोमवारी झालेल्या सलून चालकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबई सलून ब्युटीपार्लर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, इंधन, घरगुती गॅस सिलिंडर, खाद्यतेलासह सौंदर्यप्रसाधनांचे दर वाढले आहेत. वाढत्या महागाईचा फटका सगळ्यांनाच सारखाच बसत आहे.

मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरापासून ते देशात महागाईची झळा आता तीव्र होणार आहे. इतर सर्व गोष्टींचा दरात वाढ केली जाते परंतु सलून चालकांच्या कौटुंबिक आणि व्यवहारिक खर्चाचा ताळमेळ बसत नाही. मिळकत कमी असल्याने कौटुंबिक अडचणी आणि आर्थिक परिस्थिती पाहता सलून चालकांचा ब्युटी पार्लर आणि सलून दरात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे.तसेच साध्या सलूनमध्ये ३० टक्के भाववाढ जाहीर करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here