पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये जिलेटिन कांड्यांचा वापर करून दोन भामट्यांनी एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या अज्ञात चोरांनी पहाटे तीनच्या सुमारास चिखली परिसरातील कॅनरा बँकेचे एटीएम जिलेटिनच्या कांड्या लावून उडवले. या स्फोटात लाखो रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पहाटे तीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एटीएम लुटण्याचा उद्देशाने हा ब्लास्ट घडवून आणला होता. या स्फोटात बऱ्याच नोटा जळून खाक झाल्या आहेत याचा नेमका आकडा बँक अधिकाऱ्यांची परीक्षा नंतर कळून येईल. दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे दोनी चोरांचा चोरीचा बेत मात्र यामुळे फसला त्यांना काहीच रोकड लुटता आलेली नाही. घटनास्थळावरून त्यांनी पकडल्यामुळे पोलीस या भागात त्यांचा शोध घेत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम