द पॉईंट नाऊ ब्युरो (मुंबई) : महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागणीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. आता मुंबई पोलिसांनी भोंग्यांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबईमध्ये रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे भोंगे वाजवण्यास मुंबई पोलिसांद्वारे बंदी घालण्यात आली आहे. सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची आता परवानगी नसेल. जर कोणीही या आदेशाचे उल्लंघन करून भोंगे लावले, तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मनसेच्या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले. मशिदींवरील भोंगे काढा, अन्यथा आम्ही हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसेने दिला होता. याबाबत राज्य सरकारची बैठक देखील झाली. तसेच भोंग्यांच्या बाबत निर्णय घेण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता मुंबई पोलिसांनी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद करण्याच्या या महत्वपूर्ण निर्णयाने आता राज्यात इतर शहरांत देखील काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम