द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. मात्र आज या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. देशमुख यांच्या जावयाला कुठलीही नोटीस न देता CBI ने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
आज जावई व त्यांच्या वकिलाला 10 जनांच्या टीम ने ताब्यात घेतले आहे. यामुळे नुकतेच व्हायरल होणारी पोस्ट देशमुखांना क्लिनचिट तर आता जावायला अटक हे बघता देशमुखांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. "देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे " असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 1, 2021
देशमुख यांचे जावई यांचा या केसमध्ये संबंध आजपर्यंत आला नव्हता कुठे नावही नव्हते मात्र आता अचानक ताब्यात घेतल्याने शंका बळावल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम