जालना जिल्हात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना बोगस बियाणे बाजारात विकले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. काबाडकष्ट करणारा गरीब शेतकरी उत्पादन वाढीसाठी नावाजलेल्या कंपनीच्या रासायनिक खताची मागणी करतात. त्या खतासोबत शेतकऱ्यांची फसवणूक करून कमी दर्जाच्या खताची जबरदस्तीने विक्री केली जाते. शंभर रुपये जादा दराने खताची खरेदी करावी लागत असल्याचे मंठा तालुक्यातील चित्र आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये अशिक्षित शेतकऱ्यांकडून फायदा घेऊन बोगस बियाण्यांची विक्री केली जात आहे.सध्या रासायनिक खतांची विक्री होलसेल मध्य होत असून , रासायनिक खतांसोबत खते, बी-बियाणे आणि औषधी विक्री करणारे दुकानदार जबरदस्तीने लिंकिंगच्या नावावर शेतकऱ्यांच्या पदरात लिंकिंगची ही खते बिनकामाची ठरत आहेत. याकडे कृषी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असून, कोणतीही प्रतिक्रिया घेत नाही, उघड्या डोळ्याने हा भ्रष्टाचार पाहत आहे.
रासायनिक खते, बी. बियाणे शेतकऱ्यांना शासनाने ठरवलेल्या दरात विक्री करणे बंधनकारक आहे. परंतु, भ्रष्ट अधिकारी आणि रासायनिक खतांचे अधिकृत विक्रेते यांची हातमिळवणी असल्यामुळे शेतकऱ्यांची बोगस बियाणे नको असल्याने शंभर रुपये जादा देऊन पिळवणूक सध्या होत आहे. शेतकऱ्यांना बियाणे कंपनीकडून कधी कधी बोगस बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते, पुरवठा करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम