मुंबई-गोवा महामार्ग एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गोवा महामार्गाच्या रुंदी करणाचे काम रखडले असून वाहतूकीची कोंडी होते. कामासाठी जवळपास एक महिना महामार्गावरील वाहतूक बंद असणार आहे. वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
चिपळूण येथे झालेल्या स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण जवळील परशुराम घाटातील महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असून, या कामासाठी 22 एप्रिलपासून महिन्याभर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 5 या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली यानुसार नियोजन करण्यात आले आहे.
परशुराम घाटपरिसरात पर्यायी मार्गाबाबत पाहणी केली असून, वाहतूकीसाठी पर्यायी मार्गे वळवताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चार ठिकाणी पोलीस तैनात केले आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला तर 22 एप्रिलपासून लहान वाहने, राज्य परिवहन मंडळाची वाहने आणि लोटे एमआयडीसीतील बसेसची वाहतूक ही लोटे-चिरणी-आंबडस मार्गे चिपळूण सुरु ठेवण्यात येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम