दिल्लीत पुन्हा मास्क अनिवार्य, आकारणार 500 रुपये दंड

0
13

नवी दिल्ली: कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे चित्र दिसू लागल्यावर देशभरात निर्बंध शिथील करण्यात आले होते परंतु आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढत झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने पुन्हा मास्क अनिवार्य केलं असून लोकांना तशा सूचना दिल्या आहेत. लखनऊ तसेच एनसीआरमधील सहा जिल्ह्यांमध्ये लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असेल अशा सूचना देखील उत्तर प्रदेश सरकारने दिल्या आहेत. दुसरीकडे राजधानी दिल्लीतही रुग्णसंख्या वाढू लागल्याने असल्याने मास्क अनिवार्य करण्यात आले असून नियम न पाळणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहताच दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) मंगळवारी राजधानीत मास्क घालणं अनिवार्य केले. त्याचबरोबर मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि 500 रुपये दंड आकारला जाईल असेही बजावण्यात आले आहे.

दरम्यान, सरकार मास्क न घातल्यास दंडवसुली करण्याचा कोणताही विचार करत नसल्याचं उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, “कोरोना अजून बराच काळ राहणार असल्याने आपल्याला त्याच्यासोबत जगण्याची सवय केली पाहिजे. पण जर रुग्णसंख्या वाढली तर आम्ही कठोर निर्णय घेऊ. असेही त्यांनी स्पष्ट केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here