मुंबईतील मच्छीमारांच्या विविध प्रश्नांबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राजभवनावर आंदोलन केले. यावर मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
मच्छीमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात मच्छीमार काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. यावेळी धनाजी कोळी, संतोष कोळी, रवींद्र पांचाळ, मार्तंड नाखवा, जयेंद्र झेमणे, कृष्णा पावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश मच्छीमार काँग्रेसने सोमवारी ‘ चलो राजभवन ‘ चा इशारा देत, राजभवन बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आधीच वाढत्या इंधन दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सरकारच्या धोरणांमुळे मच्छीमारांना २५ रुपयांनी महाग झालेले डिझेल खरेदी करावे लागत आहे.
योग्यरित्या वर्गीकरण करण्याची मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. तर, सीआरझेड कायद्यातील आधुनिकीकरणामुळे संपूर्ण कोळीवाडेच चित्र पालटू लागले आणि त्याजागी काँक्रीटचे जंगल होऊन आणि मच्छीमार हद्दपार होऊन जातील, अशी भीती भाई जगताप यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम