गणेश नाईकांवर गुन्हा दाखल, अटकेसाठी पोलिस पथक रवाना

0
55

ऐरोलीचे भाजप आमदारावर गणेश नाईक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. गणेश नाईकांची अटकेची शक्यता व्यक्त केली जातेय. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजप आमदार गणेश नाईकांचा शोध नवी मुंबई पोलिसांकडून सुरु आहे.

१५ तारखेला गणेश नाईक यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी आणि लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. नाईकांन विरोधात बेलापूर आणि नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला. नाईक यांना त्वरित अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणात नाईक यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यात आहे.

गणेश नाईकांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून कोपरखैरणेमधील घर, कार्यालय आणि मुरबाडमधील फार्महाऊसवर कडक नजर ठेवण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे.

यावेळी एनसीपीच्या प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस तथा पनवेल शहराच्या पक्ष निरीक्षक भावना घाणेकर, अशोक गावडे, अन्नू आंग्रे, गौरी आंग्रे, नवी मुंबई निरीक्षक निशा सोनावणे, पनवेल शहर अध्यक्षा नेहा पाटील, नवी मुंबई अध्यक्षा डॉ. प्राजक्ता मोंडकर, कार्याध्यक्षा सुनीता देशमुख आदी उपस्थित होते.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here