नीट पीजी 2022 पुढे ढकलली? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रा मागचं सत्य काय?

0
40

the point now: नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट 2022 (National Eligibility cum Entrance Test Post Graduate, NEET PG) या परीक्षेसंबंधी एक नोटीस सोशल मीडियावर बरीच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये नीट पीजी 2022 ही परीक्षा 6 ते 8 आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे.तसेच या पत्रात भारत सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तर नीट पीजी 2022 च्या काऊन्सेलिंगला(NEET PG 2022 Counselling) होणारा विरोध पाहता आणि नीट पीजी 2022 पुढे ढकलण्याच्या डडॉक्टरांच्या विनंत्यांमुळे या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे देखील यात म्हटले आहे.

या प्रतिमांचे सत्य उघडकीस आणण्यासाठी सरकारी धोरणे आणि योजनांसंबंधी चुकीच्या माहितीला उत्तर देणाऱ्या पीआयबी फॅक्ट चेक ट्विटर हँडलने याचे फॅक्ट चेक केले आहे. त्यानुसार नीट पीजी 2022 परीक्षा 6 ते 8 आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आल्याचा दावा करणारे हे पत्र बोगस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर असे कोणतेही पत्र आरोग्य सेवा महासंचालनालयाने जारी केलेले नाही असे पीआयबीच्या ट्विटमध्ये नमूद केले.

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा- पदव्युत्तर (NEET PG) 2022 अर्जात दुरुस्ती करण्यासाठी मंगळवार 29 मार्च 2022 पासून सुरूवात करण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज जमा केला होता. त्यात कुठलाही बदल वा सुधारणा करायची असेल तर दुरुस्ती विंडो उघडण्यात आली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here