राज्यातील वातावरणात गारवा, अवकाळ पाऊस लावणार हजेरी

0
93

राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरु असून शरीराची लाही लाही होत आहे. कडाक्याच्या उन्हाचे चटके बसताना नागरिकही त्रस्त झाले आहेत. परंतु दोन दिवस वातावरणात गारवा निर्माण झाला आहे अवकाळी पावसाची वाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिकांना थोडा थंड हवेचा आनंद घेता येणार आहे.

बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात चक्रीय वादळी वारे वाहणार आहे. त्यामुळे हवामान खात्याकडूनही महाराष्ट्रात 21 एप्रिलपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील या भागात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. सलग दोन दिवस पावसाचा इशारा दिला असून हवामान बदल देखील दिसत आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील चंद्रपूर आणि अकोल्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दुसरीकडे मात्र काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. कडक उन्हात पडणारा पाऊस शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा ठरत आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या चेहरावर हास्य उमटले आहेत. तर काही शेतकरी अडचणीत आले, हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले तर मोठा फटका बसणार आहे.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here