भाजप सत्तेत असताना भोंगे का उतरवले नाहीत?; प्रवीण तोगडियांचा सवाल

0
21

मुंबई: मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. हे भोंगे हटवण्याची मागणी करत मनसे आणि भाजपने आक्रमकपणे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर पोलीस प्रशासनाला भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा वेळ दिलाआहे. तसेच भाजपच्या विविध नेत्यांकडूनही या मागणीचे जोरदार समर्थन केले जात आहे. यावर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Pravin Togadia News) यांनी मात्र भाजप नेत्यांना अडचणीत आणणारा प्रश्न विचारत टीका केली आहे.

महाराष्ट्रात तुमचं सरकार असताना तर तुम्ही भोंगे हटवले नाहीत. मात्र आता राज्यात दुसऱ्या कोणाचं तरी सरकार आल्यानंतर तुम्ही भोंगे हटवण्याची मागणी करत असाल तर चांगली गोष्ट आहे,’ असा टोला प्रवीण तोगडिया यांनी लगावला आहे. तसंच हे भोंगे उतरवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्याची विनंती भाजप नेत्यांनी केंद्र सरकारकडे करावी म्हणजे हा प्रश्न कायमचा संपेल, असेही तोगडिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण भडकू लागल्यानंतर राज्य सरकारनेही या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भोंग्यांबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here