मुंबई मायानगरी प्रत्येकाला आकर्षित करते. आता या सौंदर्यवतीं मायानगरीत एक सुंदर डेक उभारण्यात आला आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर शहरातील दुसऱ्या व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. बीएमसीने गिरगावात व्ह्यूइंग डेक बांधण्याची कल्पना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मांडली होती.
उद्घाटन 17 एप्रिल रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुसऱ्या व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना अरबी समुद्राच्या दृश्याचा आनंद घेता येईल. या एका अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्हचे विहंगम दृश्य अनुभवू शकता याआधी दादरमध्ये पहिल्या व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन सोहळा पार पडला आहे.
शनिवारी १६ एप्रिल रोजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील एका वन्यजीव प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, सिंग चहल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार इत्यादी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम