आपल्याकडे खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. एका बाजूला पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, आता सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा चटका बसणार आहे. खाद्य तेलाच्या दरात दुपटीने वाढ झाल्याने नागरिक झालेत संतप्त. मुंबईतील सर्वात स्वस्त खाद्यपदार्थ वडापाववर दोन ते पाच रुपये किंमत वाढली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेल महागले होते. त्यात रशिया-युक्रेन युद्धस्थितीमुळे सूर्यफूल आणि सोयाबील तेलाचे भाव आधीच वाढलेले आहेत. ऐन उन्हाळ्यात पापड, कुरडई, लोणचे करणाऱ्या घरातील गृहिणींना हात आखडता घ्यावा लागत आहे. घरातील तेलाच्या फोडणीला देखील महिलांना काटकसर करावी लागणार आहे. तेलाचे तळणार पदार्थ आता महागणार असून मुंबईतील गोरगरिबांना वडापाव खाणे देखील महाग झाली आहे.
भारतात मोठ्या प्रमाणावर पाम तेलाचा वापर केला जातो.हॉटेल तसेच कॅटरस साठी वापरण्यात येणारे पामतेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशिया हातातील निर्यातीवर बंदी घालणार आहे. यामुळे गोरगरीब जनतेला तेलाची झळ सहन करावी लागणार आहे.सूर्यफूल तेलाची किंमत आज १८० ते २५० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. मुंबईतल्या सर्वसामान्यांचे जगणे असलेला वडापावदेखील आता महाग झाला आहे. मार्च महिन्यात भारताने 5 लाख 39 हजार 793 टन पाम तेल आयात केले होते. तर फेब्रुवारीत 4 लाख 54 हजार 794 टन इतके तेल आयात करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम