जलवाहिनी कामाकरता या दिवशी, शहरातील पाणीपुरवठा बंद

0
28

नाशिक प्रतिनिधी : नाशिक येथील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील काही भागात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा केला जाणार नाही. शहराला पाणीचापुरवठा करणारी पीएससी सिमेंटची जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले.

नाशिक शहराला पाणीचापुरवठा करणारी 1200 मिमी व्यास असलेली पीएससी सिमेंटची जलवाहिनी आहे. त्र्यंबक रोड डेमोक्रेसी येथील चौकात जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीकरता किमान एक दिवस लागणार असून शहरवासीयांना पाणी जपून वापरा असा इशारा, महापालिका प्रशासनास, पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 20 एप्रिल रोजी नाशिक पश्चिम, सातपूर, नवीन नाशिक व विभागात बुधवारी पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे. तर गुरुवारी दि.21 एप्रिला या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 व 26 आणि 27 मधील भागात चुंचाळे, दत्तनगर, माउली चौक या ठिकाणी पाणी पुरवठा बंद असणार.

नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 7 :

मधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवाद नगर, दादोजी कोंडदेव नगर, अरिहंत नर्सिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाउस परिसर, सहदेव नगर, पारिजात नगर, समर्थनगर, कामगारनगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, पी.टी.सी. संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांतीनगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुलनगर, मिलिंदनगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्रीनगर, सहवासनगर, कालिकानगर, गडकरी चौक व गायकवाड नगर परिसर.

सुयोजित गार्डन परिसर, आयचित नगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांती निकेतन आदी परिसर, प्रभाग 12 मधील महात्मानगर जलकुंभ परिसर,

नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक 25 :

प्रभाग 27 मधील चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलीबाबानगर, अंबड मळे परिसर, प्रभाग 28 मधील खुटवडनगर, माउली इंद्रनगरी परिसर, कामटवाडा, धन्वंतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर, महालक्ष्मीनगर, दत्तनगर, मटालेनगर व प्रभाग क्रमांक 26 मधील शिवशक्तीनगर, आयटीआय पुलाजवळील परिसर बॉम्बे टेलर, लॉन्स, वावरेनगर, अंबड गाव, महालक्ष्मी नगर आदी परिसरात बुधवारी दि.20 एप्रिल रोजी संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here