– सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधि : जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या येथील दि देवळा मर्चन्ट को – ऑप बँकेला ३१ मार्च अखेर सर्व तरतुदी वजा जाता १ कोटी ३ लाख ५० हजार ५१५ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती चेअरमन कोमल भारत कोठावदे यांनी दिली .
बँकेची सांपत्तिक स्थिती पुढील प्रमाणे
भाग भांडवल- ३ कोटी २३ लाख ४२ हजार ३०० रुपये , निधी – २९ कोटी ३५ लाख ३९ हजार ५३८ रुपये , ठेवी – ८९ कोटी ३१ लाख ८८ हजार २५३ रुपये , कर्ज वाटप – ६१ कोटी ७४ लाख १५ हजार ५१५ रुपये , गुंतवणूक – ५२ कोटी २ लाख ७८ हजार ३०८ रुपये , थकबाकी – १५. ३७ टक्के , निव्वळ एनपीए – २. ९९ टक्के , सीडी रेशो – ६९ . १२ टक्के व नफा – १ कोटी ३ लाख ५० हजार ४५९ रुपये याप्रमाणे आहे .
यावेळी चेअरमन कोमल कोठावदे , व्हा चेअरमन डॉ प्रशांत निकम , जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे, संचालक सर्वश्री राजेंद्र सूर्यवंशी, प्रमोद शेवाळकर, जयप्रकाश कोठावदे, केदारनाथ मेतकर, भगवान बागड,अनिल धामणे , मयुर मेतकर , योगेश राणे, हेमंत अहिरराव ,राजेश मेतकर, अमोल सोनवणे , नलिनी मेतकर , मनिषा शिनकर, सुभाष चंदन, व्यवस्थापक गणेश ततार तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते .दरम्यान ,या बँकेची पंचवार्षिक निवडणूक ६२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध पार पडली आहे . यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान टळले असून ,सभासदांनी देखील समाधान व्यक्त केले आहे . व्यापारी बँक म्हणून नावारूपास आलेल्या देमको बँकेने मागील काळात भेट वस्तू व लाभांश वाटप केले होते . यावर्षी भेट वस्तू व लाभांश मिळावा ,अशी मागणी सभासदांनी केली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम