द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राष्ट्रवादी पक्ष(NCP)सध्या एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे. राज्यात २०२२ साली होणार्या तब्बल १८ महापालिका, २७ जिल्हा परिषद आणि २०० च्या पेक्षा जास्त नगरपालिकांच्या निवडणुकीची(election) तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे यासंदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. महाविकास आघाडी असतांना निवडणुकांची तयारी नेमकं काय दर्शवते हे बघणं महत्वाचे असेल.
पालकमंत्र्यांनी आणि संपर्क मंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यात दौरे करावेत मेळावे मात्र टाळावे , अशा सूचना पवार यांनी केल्या आहेत.
शक्य असेल तेथे एकट्याने निवडणूक लढवायची, गरज असेल तिथे मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला(BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.
प्रत्येक ठिकाणच्या राजकीय परिस्थितीनुसार आघाडी की स्वबळ याचा निर्णय घेतला जाईल तशी चर्चा देखील शरद पवारांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीला पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, राज्यमंत्री आणि काही प्रमुख नेते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम