मुंडेंची ‘करुणा’ धोक्याच्या उंबरठ्यावर ; आत्महत्येचा इशारा

0
174

बीड प्रतिनिधी : राज्यात सद्या विवाहबाह्य संबंधातील नाते समोर येत असून ते राजकीय नेत्यांना डोकेुखी ठरत आहेत, धनंजय मुंडे यांना देखील याच घटनेचा त्रास सहन करावा लागतोय, करूना मुंडे म्हणाल्या की सर्व गोष्टींचा मी भांडाफोड करणार आहे. आम्ही मरल्यासारखे जगत आहोत. त्यामुळे असं जगण्यापेक्षा मी आणि माझी मुले आझाद मैदानात सर्वांसमोर मरु, असा गंभीर इशारा करुणा मुंडे यांनी दिला आहे. यामुळे धनंजय मुंडेंची डोके दुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करुणा मुंडे विरुध्द धनंजय मुंडे वाद चांगलाच रंगला आहे. त्यातच करुणा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात अतिशय गंभीर आरोप केलेत. त्यातच करुणा मुंडे यांनी मुलांसह आझाद मैदानात सर्वांसमोर मरु, असा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा राजकीय वातारणात चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. तर त्यांच्या अनेक बायका असून त्यांच्यापासून झालेले अनेक मुले आहेत, असे वक्तव्य करुणा मुंडे यांनी केले होते. मात्र त्यानंतर करुणा मुंडे यांनी पुन्हा बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. करुणा मुंडे यांनी कोल्हापुर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. त्यानंतर त्यांना या निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला. मात्र करूणा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांनी एका वृत्त वहिनीला बोलताना अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.

करुणा यांनी आजाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या मुलाबाळांना त्रासवून अनेकांना दोन तीन कोटींच्या गाड्या घेऊन दिल्या आहेत. त्याचा मी नक्कीच भांडाफोड करणार. याबरोबरच कोणाकोणाला स्टुडियो सुरू करुन दिला आहे. त्याचाही मी भांडाफोड करणार आहे. तसेच असेही आम्ही मरल्यासारखे जगत आहोत. त्यामुळे असं जगण्यापेक्षा मी आणि माझी मुले आझाद मैदानात सर्वांसमोर मरु, असा गंभीर इशारा करुणा मुंडे यांनी दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here