द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कोरोनाच्या (Cowid) हाहाकारानंतर आता काहीसे जीवन पूर्वपदावर आले असे वाटत असतांनाच, आता तिसऱ्या लाटेचा (ThirdWave) धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि असे झाल्यास महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावावा लागेल असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही पन्नास हजारांच्या खाली आली आहे. मात्र सध्या देशातील केरळ राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. इथला कोरोना (Cowid) पॉझिटिव्हीटी दर हा १८ टक्क्यांच्या वर आहे. इथे दैनंदिन २० हजारांच्या वर रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने (Task Force) देखील तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राज्य शासन सतर्क झाले आहे.
जगात सध्या बऱ्याच देशांमध्ये कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाचा प्रभाव अजून वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.
कोरोनाचे सध्या रूप बदलत चालले असून, सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हरिएंट (Delta Variant) ने डोकेदुखी वाढवली आहे. आणि त्यात आता कोरोनाच्या अजून नवीन व्हरिएंट चे रूप समोर येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ (रात्री १० पर्यंत) सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मंदिरे सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याने, विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आणि मंदिरे (Temple) सुरू न केल्यास निदर्शनांचा इशारा दिला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला टास्क फोर्सने तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याने, सरकारसमोर मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन बाबत भाष्य केले आहे. नागरिकांनी गाफील न राहता सतर्क राहावे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. विविध देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या परिस्थितीवर टास्क फोर्स लक्ष देऊन आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने तर कोरोनाच्या प्रभावाशी आपल्याला पुढील अजून काही वर्षे तरी झगडावे लागेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे जगासमोरील कोरोनाचे हे संकट अजून संपलेले नाही असेच स्पष्ट होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम