कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून नवीन संधी उपलब्ध होताना दिसत नाही आहे. कोरोना महामारीमुळे राज्यातील युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. कोरोनानंतर अनुभवी लोकांना नोकरीची संधी मिळाली खरी पण ज्यांचे नुकतेच शिक्षण संपले त्यांचे प्रचंड हाल झाले असून नेमकी कोणती नोकरी करावी अशा अवस्थेत अनेक युवक बेहाल झाले आहेत.
मात्र, आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) फ्रेशर्ससाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. टीसीएस अँटलास हायरिंगच्या माध्यमातून (TCS Atlas Hiring) एक ऑफ-कॅम्पस हायरिंग प्रोग्राम राबवला जाणार आहे. याविषयीचं सविस्तर वृत्त ‘द बेट इंडिया’ने प्रकाशित केलं आहे.
टीसीएसच्या या भारती प्रक्रियेत गणित (Mathematics), सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र (Statistics or Economics) या विषयात M.Sc पदवी किंवा अर्थशास्त्रात (Economics) MA पदवी घेतलेल्या फ्रेश उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
TCS Atlas Hiring द्वारे निवडण्यात येणारे उमेदवार उत्कृष्ट व्यावसायिक परिणाम मिळवून देण्यास, आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्यास आणि व्यवसायाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यात योगदान देतील, असं टीसीएसने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
– भरतीसाठी आवश्यक पात्रता
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 2020, 2021 किंवा 2022 या वर्षांत पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
– किमान वय
18 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
– उमेदवारांनी इयत्ता 10 वी, 12 वी, डिप्लोमा (लागू असल्यास), पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा किमान 60 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
– नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे (NIOS) 10वी आणि 12वी पूर्ण केलेले उमेदवारदेखील या पदांसाठी पात्र आहेत.
– 2020 आणि 2021 साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या निकालात कोणताही बॅकलॉग नसावा. तसंच त्यांच्याकडे अभ्यासक्रम पूर्ण केल्याची कागदपत्रं उपलब्ध असावीत.
– 2022 साली उत्तीर्ण झाल्यानंतर एका वर्षाच्या आत उमेदवारांसाठी फक्त एका बॅकलॉगची मुभा आहे. मात्र प्रलंबित बॅकलॉग निर्धारित अभ्यासक्रमाच्या कालावधीत पूर्ण करणं आवश्यक आहे.
– उमेदवाराने शिक्षण किंवा कामातून ब्रेक घेतला असल्यास तो ब्रेक 24 महिन्यांपेक्षा जास्त नसावा. तसंच केवळ वैध कारणांसाठीच घेतलेल्या ब्रेक गृहित धरला जाईल.
– उमेवारांची सर्व संबंधित कागदपत्रं (Document Proof ), योग्य असल्यास गॅप सर्टिफिकेट (Gap Certificate) तपासलं जाईल.
– शैक्षणिक किंवा कामाच्या अनुभवादरम्यान गॅप, थकबाकी किंवा बॅकलॉग असेल तर सर्व उमेदवारांनी ते जाहीर करणं आवश्यक आहे.
– ज्या उमेदवारांना कामाचा 2 वर्षांचा अनुभव आहे, असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
सविस्तर माहितीचे सर्व अपडेट्स त्यांचा offical webstie वर मिळेल.
https://www.tcs.com/careers/entry-level
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम