देवळा तालुका पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवेदन

0
49

देवळा / तालुका पोल्ट्री असोसिएशच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन पशुधन विकास अधिकारी डॉ झाम्बरे यांना देतांना पोल्ट्रीधारक (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : देवळा तालुका पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी (दि.११ ) रोजी तहसील व पशुधन विकास अधिकारी डॉ विष्णू झाम्बरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, पोल्ट्री कंपन्याच्या आडमुठे धोरणामुळे तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आज मोठ्या प्रमाणात आर्थिक सापडला आहे, ह्या कंपन्यांवर शासनाने अंकुश ठेवला पाहिजे अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे . अशा प्रकारच्या विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने कंपनीकडून व्यवसिकांना अनुदान मिळावे ,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे .

याकामी तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक एकत्र येत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार , तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ विष्णू झाम्बरे ,डॉ संतोष पजई, श्रीमती डॉ पूजा घाडगे यांना निवेदन देण्यात आले . यावेळी देवळा तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक ,सचिन शिंदे , चंद्रकांत आहेर, दिनकर निकम, माणिक शिंदे , बाळासाहेब सोनवणे ,महेंद्र शिंदे ,रघुनाथ चव्हाण ,गणेश आहेर , भारत चव्हाण ,नितीन चव्हाण ,सागर शिंदे ,किरण आहेर ,सुनील आहेर,संदीप आहेर, हेमंत देवरे आदी पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here