सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक

0
29

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा झाले. राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे आणि सून बाई मिताली ठाकरे काही दिवसांपूर्वीच आई बाबा झाले. नातवाच्या जन्मापासूनच ठाकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांनी ५ एप्रिल २०२२ रोजी बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी सचिन मोरे यांनी फेसबुकवर “आमचे साहेब आजोबा झाले,” अशी पोस्ट शेअर केली होती. त्यासोबत त्यांनी अमित ठाकरेंचंही अभिनंदन केलं होतं.

दरम्यान बाळाच्या जन्मानंतर अमित ठाकरे यांनी नुकतंच फेसबुकवर त्याच्यासोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. बाळानं करंगळी पकडल्याचं या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील आहे. फोटोमध्ये बाळ दिसत असलं तरीही त्याचा संपूर्ण चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाही. अमित ठाकरेंनी शेअर केलेल्या या पोस्टला कॅप्शन देताना त्यांनी फक्त ‘हार्ट’ इमोजी शेअर केला आहे.

त्यांच्या या फोटोवर अनेक लाइक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. यावर मनसेचे अनेक पदाधिकारी, कुटुंबीय आणि तसेच काही जवळच्या मित्र मैत्रिणींनीही कमेंट केली आहे. यात त्यांनी अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.अमित ठाकरेंनी फोटो शेअर करताच त्यावर लाईक, कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here