‘त्या’ हल्लेखोरांवर कारवाई करा देवळा राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

0
34
देवळा / शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्त पोलीस निरीक्ष दिलीप लांडगे यांना निवेदन देताना पंडितराव निकम , यशवन्त शिरसाठ , योगेश आहेर ,दिलीप आहेर ,उषाताई बच्छाव आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवास्थानी झालेल्या हल्ल्याचा देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आज पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना देण्यात आले .

देवळा / शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्त पोलीस निरीक्ष दिलीप लांडगे यांना निवेदन देताना पंडितराव निकम , यशवन्त शिरसाठ , योगेश आहेर ,दिलीप आहेर ,उषाताई बच्छाव आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

निवेदनाचा आशय असा कि , दोन दिवसांनपूर्वी देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार

देवळा / शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्त पोलीस निरीक्ष दिलीप लांडगे यांना निवेदन देताना पंडितराव निकम , यशवन्त शिरसाठ , योगेश आहेर ,दिलीप आहेर ,उषाताई बच्छाव आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

यांच्या मुंबई येथील निवास्थानी एसटी महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी हेतुपुरस्कर हल्ला केला . हे कृत्य अशोभनीय असून , याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे . आज सोमवारी दि ११ रोजी देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या घटनेचा कडक शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन ,हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली .

यावेळी जेष्ठ नेते पंडितराव निकम ,तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ ,प्रांतिक सदस्य योगेश आहेर , शहर अध्यक्ष दिलीप आहेर ,माजी सभापती उषाताई बच्छाव ,जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार ,महिला शहर अध्यक्ष वनिता शिंदे ,नगरसेवक संतोष शिंदे ,चिंतामण आहेर , महेंद्र आहेर ,सुनील आहेर , भाऊसाहेब वाघ ,राजेंद्र आहेर ,जिआयुवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी , कृष्णा अहिरे,शन्कर आहेर ,भाऊसाहेब देवरे , रवींद्र आहेर आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here