खर्डे सोसायटीवर शेतकरी विकासची निर्विवाद सत्ता

0
32

देवळा प्रतिनिधी : खर्डे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी ५२ उमदेवारी अर्जापैकी २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते . यात बापू देवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल तर संदीप पवार व विजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील गुरुदत्त पॅनल मध्ये सरळ लढत झाली.

खर्डे विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध होईल असा कयास बांधण्यात आला होता . मात्र तो फोल ठरला . माघारीच्या दिवशी ५२ पैकी २६ उमेदवारांनी आपले अर्ज माघे घेतल्याने १३ जागांसाठी २६ उमदेवार समोरासमोर उभे ठाकले होते .

गट निहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे ;

(“सर्वसाधारण गट”)
मांगु गोविंदा गांगुर्डे – गुरुदत्त पॅनल –
रामदास नामदेव गांगुर्डे – शेतकरी विकास पॅनलविजयी – 406
तुकाराम शामभाऊ चव्हाण – शेतकरी विकास –
कारभारी पंडित जाधव – गुरुदत्त पॅनल – विजयी -382
दोधा रामभाऊ जाधव -शेतकरी विकास पॅनल-
वसंत लखा जाधव – शेतकरी विकास पॅनलविजयी – 368
हंसराज नारायण जाधव – गुरुदत्त पॅनल –
माधव रामदास ठोंबरे – गुरुदत्त पॅनल – विजयी – 361
अनिल भाऊराव देवरे -शेतकरी विकास पॅनलविजयी – 504
दातात्रेय वामन देवरे -शेतकरी विकास पॅनल- विजयी – 380
भरत बाबुराव देवरे -शेतकरी विकास पॅनल- 362
सोमनाथ मोतीराम देवरे – गुरुदत्त पॅनल –
पुंजाराम महादू पवार -शेतकरी विकास पॅनल-
रमेश वामन पवार – गुरुदत्त पॅनल –
विष्णू जयराम पवार – गुरुदत्त पॅनल –
सुभाष मुरलीधर मोरे – गुरुदत्त पॅनल – 375

——-

(अनुसूचित जाती जमाती गट )
दादाजी पोपट जाधव – गुरुदत्त पॅनल
उत्तम भिका थोरात – शेतकरी विकास पॅनल- विजयी

——-

(महिला प्रतिनिधी गट)
निर्मला तानाजी गांगुर्डे -शेतकरी विकास पॅनल-
दीपाली कृष्णा जाधव -शेतकरी विकास पॅनल- विजयी
मीराबाई वसंत जाधव – गुरुदत्त पॅनल
जयश्री संदीप देवरे – गुरुदत्त पॅनल – विजयी

——–

(इतर मागास प्रतिनिधी गट) –
दतात्रेय जगन्नाथ जाधव -शेतकरी विकास पॅनल- 336
संदीप अशोक पवार – गुरुदत्त पॅनल – विजयी -437 

———-

(भटक्या विमुक्त जाती जमाती गट) –
रामकृष्ण धोंडू कुवर – गुरुदत्त पॅनल –
युवराज बाबुराव मोरे -शेतकरी विकास पॅनल-

दोन पॅनलमध्ये समोरासमोर होणाऱ्या या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. येन उन्हाळ्यात सोसायटी निवडणुकीचा धुराळा उडाल्याने गावात राजकिय वातावरण तापले होते.

निवडणूक अधिकारी म्हणून वसंत गवळी निवडणूक निर्णय अधिकारी , केंद्राध्यक्ष म्हणून भास्कर मोरे यांनी काम बघितले, केदा गुलाब आहेर, राजेंद्र गांगुर्डे ,शरद आहेर, प्रताप गिरासे, पोपट उशिरे, रामदास जगताप, रुपेश वालझाडे, बाळू कामडे यांनी काम बघितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here