द पॉईंट नाऊ ब्युरो : मशिदींवरील भोंगे काढा, अन्यथा आम्ही त्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावू म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हटले होते. आता शिवसेना भवनासमोरच मनसे कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावल्याने नवा वाद उभा राहिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावल्या. त्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मनसेवर टीका केली.
दरम्यान, आता शिवसेना भवनासमोरच लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावल्याने, मनसेने शिवसेनेला डिवचले. याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तर त्यांच्याकडून लाऊडस्पीकर, भोंगे देखील जप्त करण्यात आले आहेत.
शिवसेना हिंदुत्वाला विसरली आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाला दूर केले, असे आतापर्यंत शिवसेनेवर टीका केली गेली. आता शिवसेना सेक्युलर झाली आहे. त्यामुळे ते हिंदू विरोध करत असल्याची टीका मनसेने केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम