मुंबई प्रतिनिधी : राज ठाकरे सध्या आक्रमक झाले असून गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. या सभेतल्या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटत असून. मशिदींवरच्या भोंग्यांबद्दलच्या राज ठाकरे यांच्या विधानामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच पुण्यात वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असतानाच आता ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेना प्रदर्शित केला आहे.
ठाण्यात १२ एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावरील राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे. राज ठाकरेंच्या १२ एप्रिलला पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे ‘करारा जवाब’ देणार असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर अजूनही चर्चा सुरु आहे. त्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार यावर भाष्य केलं होतं. यामुळे होणारी सभा महत्त्वाची असून याचे राज्यात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम