जुनी शेमळीत साजरा होणार अनोखा श्रीराम जन्मोत्सव

0
33

स्वप्निल आहिरे
सटाणा प्रतिनिधी : इतिहासात पहिल्यांदाच श्रीरामनवमी मोठ्या जल्लोषात सर्वत्र साजरी होत असून बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे संपूर्ण गावाच्या एकोप्याने उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येणार आहे.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल जुनी शेमळी आयोजित श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीराम जन्मोत्सवासाठी अतिशय भक्तीमय वातावरणात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी सात वाजता श्रीराम मूर्तीचा अभिषेक, महापूजा, आरती, खमताने येथील विश्वेश्वरनंदगिरीजी महाराज, यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ७:३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक श्लोक, स्तोत्र पठण,सकाळी १० ते १२ वा. पर्यंत श्रीराम भजनी मंडळ कडून श्रीहरी भजन,दुपारी १२ वा. प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा होईल, त्यानंतर आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

सायंकाळी चार वाजता संपूर्ण गावातून पालखी सोहळा व शोभायात्रा विद्युत रोषणाईसह श्रीराम जय राम जय जय राम या नामाच्या गजरामध्ये व भगवे ध्वज घेऊन निघेल. रात्री आठ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. वनिताताई पाटील यांचा भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी पंचक्रोशीतील श्रीराम भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा.

श्रीराम नवमी निमित्ताने संपूर्ण गावात भगवे ध्वज, विद्युत रोषणाई, श्रीरामाचे डिजिटल बॅनर , भगव्या पताका लावून गावाता भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here